भविष्य निधीतर्फे कॅम्पचे आयोजन
ब्लॅक पँथरतर्फे
परभणीतील
घटनेचा निषेध
कोल्हापूर : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी व्यक्ती ही माथेफिरू घोषीत करून भाजप सरकारने आपली कर्तव्यात कसूर केलेली कृती इतरांवर ढकलू नये. परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याचा जाहीर निषेध करीत असून, खरा मास्टर माईंड शोधून काढून त्याच्यावर कारवाई करा, या मागणीचे पत्रक ब्लॅक पँथरतर्फे प्रसिद्धिस दिले आहे.
या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी व्हावी. आंबेडकरी समाज आणि चळवळींना बदनाम करणाऱ्या या घटना घडवून आणल्या जातात की काय याची शंका येते. त्यामुळे आयोग नेमून चौकशी करून मास्टर माईंड शोधून काढावा. त्याच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. दीपक कांबळे, विष्णू कांबळे, वैजू कांबळे, सुधाकर कांबळे, सुभाष देसाई यांनी हे पत्रक प्रसिद्धिस दिले.
...
‘परभणी घटनेतील
दोषींवर कडक
कारवाई करा’
कोल्हापूर : परभणी येथे डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आणि संविधानाची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करीत आहोत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कडक करवाई करावी, या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षकांना दिले. निवेदनातील माहितीनुसार, हा प्रकार दुर्दैवी, संतापजनक असून अशा घटनेच्या पाठीमागे कोणती शक्ती, ताकद सहकार्य करते, हे शासनाने शोधून काढावे. जिल्ह्यातील संविधानप्रेमी नागरिक, कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित राखावी, असे आवाहन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतर्फे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी केले. शहराध्यक्ष अमित नागटिळे, प्रवीण बनसोडे, आकाश कांबळे, राहुल कांबळे, नितीन कांबळे, संदीप कांबळे, सचिन कांबळे, जीवन आवळे उपस्थित होते.
-----
वंचित बहुजन
आघाडीतर्फे ईव्हीएम
स्वाक्षरी आंदोलन
कोल्हापूर : वंचित बहुजन युवा आघाडी शहर आणि करवीर तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू असून, कोल्हापूरमध्ये याची आज सुरुवात करून ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी राबविली. मोहिमेमध्ये सुजान मतदार नागरिक तसेच विद्यार्थी, कामगार, सर्व वर्गांतील लोकांनी, पक्ष, संघटनांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केल्या. इव्हीएम विरोधात आपली मते व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे, शहराध्यक्ष अमित नागटिळे, करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, युवा महासचिव डॉ. आकाश कांबळे, दीपक कांबळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सचिन कांबळे, प्रशांत कांबळे, संविधान सन्मानचे नीलेश बनसोडे, शिवराम बुधाळकर, पंकज आठवले, विशाल कांबळे, रवी कांबळे, रतन कांबळे, संग्राम कांबळे उपस्थित होते.
...
‘जय भारत’मध्ये
वार्षिक स्नेहसंमेलन
कोल्हापूर : जय भारत शिक्षण संस्था संचलित जय भारत हायस्कूल, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरतर्फे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष (कै.) डॉ. श्रीधर सावंत यांच्या ११२ व्या जयंतीच्या निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष पी. एस. जाधव यांच्या हस्ते झाले.
गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली. यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेता आसीफ अत्तार याचाही समावेश होता. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार शिवकुमार हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. ‘मृदुगंध’ हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी २१ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, सदस्या रेणू जाधव, अंकिता जाधव, अशोक चिमटे, भालचंद्र सावंत, अमृत शिंदे उपस्थित होते. मुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. शीतल गोंधळी, पूनम माळी यांनी सूत्रसंचालन केले. वैभव अंबपकर यांनी ओळख करून दिली. सांस्कृतिक विभागप्रमुख अरुण कुंभार, पालक अमृत शिंदे यांनी आभार मानले.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

