इचल : संक्षिप्त

इचल : संक्षिप्त

Published on

जैन उपवर वधू वर
पालक परिचय मेळावा
इचलकरंजी : जैन उत्कर्ष मंडळ, इचलकरंजीच्या वतीने २९ वा जैन वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. मेळावा रविवारी (ता. १२ जानेवारी) श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे. यासाठी नावनोंदणी सुरू आहे. सूची पुस्तिकेत पाल्याची माहिती छापून येण्यासाठी नावे नोंद करणे आवश्यक आहे. १२ वी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या मुलींची मोफत नोंदणी होणार आहे. २८ वर्षे जैन उत्कर्ष मंडळातर्फे असा मेळावा इचलकरंजीत आयोजित केला जातो. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश येथून सर्व स्तरातील उपवर मुला मुलींची नोंद जैन उत्कर्ष मंडळाकडे होते. यावेळी ऑनलाईन नावनोंदणीची सोय आहे. ३१ डिसेंबरपूर्वी नाव नोंदवून मंडळास सहकार्य करावे; असे आवाहन केले आहे.

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे
इचलकरंजी : पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी सोपी आहे. भीती न बाळगता टक्केवारी कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावा; असे प्रतिपादन मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले. ते महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे इयत्ता दहावी वर्गाची पालक सभेदरम्यान बोलत होते. यावेळी वर्गशिक्षक एम. ए. कुंभार, पी. जी. पाटील यांनी वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती तसेच मुलांच्या अभ्यासासंदर्भांत पालकांना माहिती दिली. यावेळी सचिन कांबळे, पी. जी. पाटील, एम. ए. कुंभार उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पी. जी. पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com