‘कोल्हापूर’ची सीएनए क्रिकेट संघांवर मात
31464
कोल्हापूर ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील मुलींच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या गटात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला संघाने अव्वल स्थान पटकाविले.
...........
‘कोल्हापूर’ची सीएनए क्रिकेट संघावर मात
गटात अव्वल ः ज्ञानदा निकमची शतकी खेळी व्यर्थ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या निमंत्रित १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाने सीएनए क्रिकेट क्लब (पुणे) संघावर तीन गडी राखून मात केली. या विजयामुळे कोल्हापूरचा संघ गटात अव्वल ठरला.
शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर आज या दोन संघांत सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना सीएनए संघाने ४९ षटकांत ९ बाद १९३ धावा केल्या. यात ज्ञानदा निकमने १२२ धावांची शतकी खेळी केली, तर समीक्षा पवारने ४८, गार्गी अवसरेने ३९, आर्या चिखलीकरने २२, सिद्धी घाडगेने १७, अस्मिता पवारने १४ धावा केल्या. कोल्हापूरकडून सेजल सुतारने चार, ईश्वरी राणे, परिणिता पाटील, मधुरा इंगवले, प्राजक्ता घाटगे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
हे आव्हान कोल्हापूर संघाने ४० षटके आणि एका चेंडूत ७ गड्यांच्या मोबदल्यात पार करीत विजय मिळवला. यात परिणिता पाटीलने ८३, मुस्कान खटवाणीने ३३, मधुरा इंगवलेने २२ आणि सेजल सुतारने नाबाद ११ धावा केल्या. सीएनए संघाकडून मनकर्णिका शिंदे, श्रेया मर्कंड जैन यांनी प्रत्येकी दोन, तर गार्गी अवसरे, आर्णा पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, ते कोल्हापूर संघाला विजयापासून रोखू शकले नाहीत. या विजयामुळे कोल्हापूर संघाने पाच पैकी पाच सामने जिंकत गटात अव्वल स्थान पटकाविले.
....
चौकट..
विजयी संघ
परिणिता पाटील (कर्णधार), आदिती चोरगे, उत्कर्षा जाधव, ईश्वरी राणे, जान्हवी चौगुले, मधुरा इंगवले, मुस्कान खटवाणी, प्राजक्ता घाटगे, साक्षी पोतदार, सेजल सुतार, सुदीक्षा देसाई, रसिका शिंदे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

