जॉय स्ट्रीट

जॉय स्ट्रीट

Published on

लोगो- बुधवारच्या टुडे पान एकवरुन

चला, रविवारी एकवटूया,
सर्किट हाऊस- सेवा रुग्णालय रस्त्यावर

सलग दुसऱ्या रविवारी कोल्हापूरकरांचा सहकुटुंब आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : सलग दुसऱ्या रविवारी (ता. १५) आता सर्किट हाऊस ते सेवा रुग्णालय या रस्त्यावर ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘मेट्रोलाईफ सिटी’ प्रस्तुत ‘जॉय स्ट्रीट’ उपक्रम रंगणार आहे. सकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत कोल्हापूरकरांना सहकुटुंब आनंदोत्सव साजरा करता येणार आहे. बटू बिल्डर्स उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, तर चितळे डेअरी सहप्रायोजक आहेत. हार्ले डेव्हिडसन, तोडकर संजीवनी यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
‘सकाळ’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी या उपक्रमाला प्रारंभ झाला. गेल्या रविवारी झालेल्या उपक्रमाला हजारो कोल्हापूरकरांनी उपस्थिती लावली. त्यामुळे आता येत्या रविवारच्या उपक्रमाबाबत मोठी उत्सुकता आहे. ‘जॉय स्ट्रीट’वर विविध नृत्याविष्कारांसह खेळांचाही आनंद लुटता येणार आहे. फ्लॅश मॉब, सायकलिंग, झुम्बा, फुटबॉल, गल्ली क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, योगा, मेडिटेशन, स्केटिंग, रस्सीखेच, दोरी उड्या, माईंडफूल अॅक्टिव्हिटीज, वन मिनिट चॅलेंज गेम, स्ट्रीट आर्ट आदी खेळ आणि कलाविष्कार येथे अनुभवता येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
- सूरज (९५५२५८१९१८)
- प्रतीक (९१३०४४६५६६).
........................
चौकट
दृष्टिक्षेपात जॉय स्ट्रीट
- कधी : रविवारी (ता. १५)
- कुठे : सर्किट हाऊस ते सेवा रुग्णालय रस्त्यावर
- वेळ : सकाळी साडेसहा ते नऊ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com