नाताळकरीता स्टॉलचे उद्घाटन
फोटो 31470
ख्रिसमस फेस्टिव्हलला प्रारंभ
वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : ख्रिसमस (नाताळ) सण २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पाश्र्वभूमीवर न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये आज ख्रिसमस फेस्टिव्हलला प्रारंभ झाला.
रेव्हरंड डी. बी. समुद्रे, रेव्हरंड अशोक गायकवाड, रेव्हरंड सिनाय काळे आणि सेशन मेंबर यांच्या हस्ते ख्रिसमस फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. फेस्टिव्हलमध्ये खाद्यपदार्थांचे ३२ स्टॉल्स उभे केले आहेत. विविध स्पर्धांमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी झाले आहेत. यामुळे वायल्डर मेमोरियल चर्चच्या परिसरात चैतन्य पसरले आहे. लहान मुलांचे गिटार आणि विविध वाद्यांच्या गजरात होणारी कॅरोल सिंगीगने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गिटारची धून अन् ख्रिस्तांच्या गाण्यांनी परिसर मंत्रमुग्ध होऊन गेला. फेस्टिव्हलचे नियोजन बिपीन अष्टेकर, सुशील अष्टेकर, सचिव संदीप थोरात, अध्यक्ष शकुंतला चोपडे, सदस्य अमोल चोपडे, सचिन समुद्रे, रजनिकांत चोले, अमोस अष्टेकर आदींनी नियोजन केले.
बाजारपेठ सजली
नाताळसाठी पापाची तिकटी, टेंबे रोड परिसरातील दुकानांमध्ये नाताळसाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवले आहे. यामध्ये बेथलेहेमच्या गोठ्याची प्रतिकृती, येशू ख्रिस्तांची प्रतिमा, भेटवस्तूंचे बॉक्स, पाईन वृक्षांची प्रतिकृती, सांता क्लॉज, फरच्या टोप्या, सांता क्लॉलजची रेनडिअरची गाडी, कॅरोल सिंगीगचे साहित्य, स्नो मॅन, जिंगल बेल्स, नाताळचे आकाशकंदील आदी साहित्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

