थकबाकी वसुली

थकबाकी वसुली

Published on

घरफाळा थकबाकी वसुलीसाठी
मिळकतीवर बोजा नोंद

कोल्हापूर, ता. १३ : महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागास आर्थिक वर्षाअखेरीस एकशेएक कोटी रुपयांची उद्दिष्ट दिले आहे. एक एप्रिल ते तेरा डिसेंबर अखेर शहरातील ८६ हजार १८० मिळकतधारकांनी आजअखेर घरफाळा भरला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार एक डिसेंबर २०२४ पासून उर्वरित मिळकतींच्या चालू घरफाळा आकारणीवर दंड आकारला जात आहे. मात्र, आता थकबाकीदारांच्या मिळकतींवर सोमवारपासून (ता. १६) सील व बोजा नोंदीची कारवाई होणार आहे.
घरफाळा विभागातर्फे चारही विभागीय कार्यालयांतर्गत चार वसुली पथके नियुक्त केली आहेत. शहरामध्ये नोव्हेंबर २०२३ पासून घरफाळा रिव्हिजन सर्व्हेचे कामकाज सुरू असून, २१ हजार ९०९ मिळकतींचा रिव्हिजन सर्व्हे पूर्ण झाला आहे. शहरातील मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केलेला नसेल, तर त्यांनी थकीत घरफाळा भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com