‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये कोल्हापूर अव्वल

‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये कोल्हापूर अव्वल

Published on

‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये कोल्हापूर अव्वल
पश्‍चिम महाराष्ट्रातील कामगिरी : सात लाख १५ हजार ग्राहकांनी भरली वीज बिले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : निमशहरी व ग्रामीण भागात वीज बिल भरण्याची सुविधा असलेल्या, तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अव्वल आला आहे. सहा महिन्यांत जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख १५ हजार ४६५ ग्राहकांनी ७२ कोटी ९७ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे.
जिल्ह्यातील ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटधारकांना ३५ लाख ७७ हजारांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ९४४ ग्राहकांनी ५८ कोटी ५९ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. जिल्ह्यातील ८३ वॉलेटधारकांना २९ लाख ४ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. सांगली जिल्ह्यात एक लाख ६ हजार ६० वीजग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात ७९ वॉलेटधारकांना ५ लाख ३० हजार रुपयांचे कमिशन मिळाले. सोलापूर जिल्ह्यात ९१ हजार ८३५ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १२ कोटी ७६ लाख रुपयांचे वीजबिल भरले. यात ५१ वॉलेटधारकांना ४ लाख ५९ हजार रुपयांचे कमिशन मिळाले. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील १ लाख १२ हजार ३५८ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १६ कोटी ९६ रुपयांचा भरणा केला. यात संबंधित ५६ वॉलेटधारकांना ५ लाख ६१ हजार रुपयांचे कमिशन मिळाले.

हे होऊ शकतात वॉलेटधारक
वयाच्या १८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती, छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सुविधा आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय किंवा उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com