सॉफ्टबॉलमधील पिचिंग अचूकपणे समजणार

सॉफ्टबॉलमधील पिचिंग अचूकपणे समजणार

Published on

31497
कोल्हापूर ः सॉफ्टबॉल खेळातील पिचिंगबाबत केलेल्या संशोधनाला पेटंट मिळाल्याबाबत डॉ. रोहित पाटील यांचा सत्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेजारी प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे उपस्थित होते.
........
सॉफ्टबॉलमधील पिचिंग अचूकपणे समजणार

महावीर महाविद्यालयातील डॉ. रोहित पाटील यांच्या संशोधनाला पेटंट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः येथील महावीर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित पाटील यांनी सॉफ्टबॉलमधील बॉल पिचिंग अचूक समजण्यासाठी उपकरण तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला केंद्र सरकारचे पेटंट मिळाले आहे. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. पाटील यांनी सॉफ्टबॉलमध्ये बॉल पिचिंग करताना तो बरोबर की चूक, याविषयी संशोधन करून एका उपकरणाची निर्मिती केली आहे. त्याच्या वापरातून पिचरने टाकलेला चेंडू बरोबर की चूक, हे पंचांच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे. यासाठी त्यांनी केलेले संशोधन पेटंटसाठी मंजूर झाले असून, त्यांना त्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
पाश्चात्य देशांत या सॉफ्टबॉल खेळामध्ये आधुनिकता दिसून येते. परंतु भारतात या खेळामध्ये पंचांच्या भूमिकेवर किंवा निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. प्रत्येक सामन्यात किंवा अटीतटीच्या सामन्यात पंचांची भूमिका निर्णायक ठरते याच गोष्टीवर मात करण्यासाठी या खेळामध्ये स्ट्राइक पीच व बॉल पीचमधील योग्य निर्णय उपकरणाद्वारे होणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे उपस्थित होते. डॉ. पाटील यांना आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. के. ए. कापसे, सचिव एम. बी. गरगटे, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांचे प्रोत्साहन लाभले.
........
चौकट...
योग्य निर्णय, खेळ वाढीला प्रेरणा
या उपकरणातील सेन्सर आणि कॅमेऱ्याच्या मदतीने मुख्य पंचांच्या हातातील मोबाईलमध्ये आणि त्याचबरोबर संबंधित खेळाच्या मार्गदर्शकांकडे बॉल पिचिंगची माहिती जाणार आहे. त्यामुळे या खेळात अधिक सुस्पष्टता आणि योग्य निर्णय होऊन हा खेळ वाढीस प्रेरणा मिळणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com