खोदाई बंद पाडली

खोदाई बंद पाडली

Published on

चुकीच्या खोदाईवरून
जयसिंगपूरला काम बंद
जयसिंगपूर, ता. १३ : शहरात चांगल्या रस्त्याची खोदाई करून गॅस पाईपलाईन टाकली जात असल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्ते सागर मादनाईक यांनी शुक्रवारी खुदाईचे काम बंद पाडले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी; अशी मागणी त्यांनी केली. शहरात गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाई केली जात आहे. चुकीच्या पध्दतीने लाईनचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मादनाईक यांनी सातव्या गल्ली येथे पाहणी केली असता रस्त्याच्या बाजूला असलेला कोबा वाचविण्यासाठी डांबरी रस्ता उकरण्यात आल्याचे दिसून आले. चुकीच्या पध्दतीने शहरात काम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी; अशी मागणी केली असून योग्य पध्दतीने पाईपलाईनचे काम करण्याची मागणी केली असल्याचे मादनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com