औद्योगिक क्रांतीची भूमी कोल्हापूर : नारायण बुधले
31507
औद्योगिक क्रांतीची भूमी
कोल्हापूर : नारायण बुधले
कोल्हापूर, ता. १३ : उद्योग व्यवसाय क्षेत्रातील कोणतेही काम येथे अशक्य नाही. गाडीच काय तर विमान व रणगाडे निर्मितीची क्षमतही कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राची आहे. ही औद्योगिक क्रांतीची भूमी आहे; असे मत बुधले अँड सन्स लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर नारायण बुधले यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगअसोसिएशन च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
असोसिएशन ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी या व्यवसायात ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिलेल्या व्यावसायिकांचा सत्कार झाला. रोहिदास चौगले, ब्रिजलाल ललवाणी, अनंत सरदेशपांडे, अशोक बुरसे, जयसिंग शिंदे यांना शाल, श्रीफळ , सन्मानपत्र देऊन गौरविले. सभेत असोसिएशनच्या सभासदांसाठी अपघात विमा काढण्याचा तसेच ओळखपत्र देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच असोसिएशनमार्फत वर्षभर राबवण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, टेक्निकल प्रोग्रॅम, क्रीडा स्पर्धा यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाला अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष मुकुंद रणदिवे, सचिव विजय निपाणीकर, खजानीस संदीप जोशी, संचालक संतोष वाळके, प्रदीप पुरवणं, भिकाजी पवार, संजय मळेकर, राजेंद्र इंगवले व सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

