-

-
Published on

फोटो 36649

हॉकी स्टेडियम चौकाजवळील
जलवाहिनीची दुरुस्ती सुरू

कोल्हापूर, ता. ५ ः हॉकी स्टेडियम चौकाजवळ शनिवारी रात्री फुटलेल्या जलवाहिनीची रविवारी तातडीने दुरुस्ती सुरू केली. रात्रीपर्यंत ती पूर्ण केली जाणार असली तरी रविवारी दिवसभर त्या परिसरातील पाणीपुरवठा बंद झाला.
कळंबा फिल्टर हाऊसवरून हॉकी स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी १६ इंची जलवाहिनी आहे. शनिवारी रात्री ती फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेले. त्याचा व्हॉल्व्ह बंद करून पाणी थांबवण्यात आले. रविवारी सकाळपासून खोदाई सुरू करण्यात आली. जलवाहिनी फुटल्याने जवळपास वीस फुटाचा भाग काढण्यात आला. सायंकाळपर्यंत नवीन भाग जोडण्याचे काम सुरू होते. रात्रीपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. उद्या दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने काम संपल्यानंतर त्या भागात पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com