

37025
मुरुम टाकून कारखानदारांनी
बुजविल्या अपूर्ण गटारी
कोल्हापूर, ता. ७ ः गोखले कॉलेज ते माऊली पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा केलेले गटारीचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे कारखानदारांना, वाहनधारकांना त्रास होत असल्याने पांजरपोळ इंडस्ट्रीजमधील कारखानदारांनी आज अपूर्ण गटारी मुरूम टाकून बुजविल्या.
१०० कोटी निधीतून केल्या जात असलेल्या रस्त्यांमध्ये यादवनगरमधून जाणाऱ्या रस्त्याचेही काम आहे. ते गतीने केले जात नाही. सतत आंदोलनाशिवाय कामाला चालना मिळत नाही. रस्त्याचा एक थर झाल्यानंतर गटारीचे काम केले जात होते. त्याचे काम अर्धवट केले आहे. गटारीवरील स्लॅब टाकलेला नाही. त्यामुळे तेथील कारखानदार, रस्त्याशेजारील घरातील नागरिकांना वाहने रस्त्यावर किंवा जागा मिळेल तिथे लावावी लागत आहेत. त्यातून तिथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी ठेकेदारांकडे सांगूनही काही झालेले नाही. त्यामुळे वैतागून कारखानदारांनी आज अर्धवट गटारीत मुरूम टाकून त्यावरून ये-जा सुरू केली. प्रशासकांनी तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करून घेतले नाही तर रास्ता रोकोसारखे आंदोलन करण्याचा इशारा फिरोज मुजावर, समीर जमादार, सदा मेस्त्री, सुधीर दर्वण, अझर मकानदर आदींनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.