

पंधरा जानेवारीला चित्रपट
महामंडळ कार्यकारिणीची बैठक
विविध प्रलंबित विषयांवर होणार चर्चा, संचालकांतील दुफळी मिटणार?
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः एकीकडे चित्रनगरीत चित्रीकरण वाढले आहे. येथील तरुणाई सिनेक्षेत्रात अनेक नव्या संकल्पना यशस्वी करत असतानाच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंधरा जानेवारीला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीकडे सभासदांचे लक्ष आहे. यानिमित्ताने आता तरी संचालकातील दुफळी मिटून सभासदांच्या भल्याने निर्णय व्हावेत, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, महामंडळाच्या खासबाग येथील मुख्य कार्यालयात दुपारी साडेबाराला ही बैठक होणार आहे.
विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपून साडेतीन वर्षे सरली तरीही निवडणूक झालेली नाही. महामंडळाची निवडणूकच अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे महामंडळच सध्या धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहे. कुठलाही खर्च करायचा असेल तर सर्व संचालकांची मंजुरी असेल, तरच परवानगी मिळते. मात्र, संचालकांतील वादच टोकाला गेला आहे.
चौकट
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत नाही...
महामंडळाच्या सर्व शाखांतील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही, तर पाणी- विजेचे बिलही वेळेत भरता येत नाही, अशी सद्यस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने चित्रपटासाठीच्या अनुदानासाठी महामंडळाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट शासनाने रद्द केली. तसा अध्यादेशही निघाला आहे. हा अध्यादेश रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.