अमल महाडिक जिल्हा परिषद बैठक़

अमल महाडिक जिल्हा परिषद बैठक़
Published on

लोगो जिल्हा परिषद
-
फोटो37095

जलजीवन मिशन योजना तत्काळ पूर्ण करा
आमदार अमल महाडिक : सौर ऊर्जासाठी आराखडा तयार करा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजना तत्काळ पूर्ण करा. या सर्व योजना सौर ऊर्जा योजनेत असाव्यात यासाठी आराखडा तयार करावा. या सर्व योजनांना स्वच्छ, मुबलक आणि विना वीज बिलाच्या असाव्यात यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देऊन दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २२ गावांमधील योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी आज दिली. आमदार महाडिक यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन, एमआयडीसी, महावितरण, तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
आमदार महाडिक म्हणाले, ‘जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील सर्व योजना सौरऊर्जेवर चालल्या पाहिजेत. भविष्यात या योजनांचे वीज बिल भरण्यास ग्रामपंचायतींना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शासनाकडून सौरऊर्जेचा लाभ मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठवा. या योजनांमधून तीस वर्ष चांगले आणि मुबलक पाणी मिळाले पाहिजे, यासाठी ठेकेदारांना सूचना द्याव्यात. ज्या गावांमध्ये पाणी टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राच्या जागे संदर्भात अडचणी आहेत, त्या गावातील ग्रामसेवक आणि सरपंचांची बैठक घेऊन या अडचणींचे निराकरण करण्यात येईल. काम पूर्ण झालेल्या गावांमध्ये तातडीने योजना कार्यान्वित केली पाहिजे.’ ज्या गावांची महावितरणकडे थकबाकी आहे, त्या गावातील ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश देण्याची सूचना महाडिक यांनी केली. यावेळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तिकेयन एस. उपस्थित होते.

चौकट
प्रजासत्ताकदिनी काही योजनांचे लोकार्पण
ग्रामस्थांना नळ जोडणीसाठी कमीत कमी शुल्क आकारावे. कणेरी येथे उभारण्यात येणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्रही चांगले व्हावे. या योजना सौरऊर्जेवर व्हाव्यात यासाठी शासनस्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर काही पाणीपुरवठा योजनांचे लोकार्पण करण्याचा मानसही आमदार महाडिक यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com