

चाकू- दांडक्यासह
ट्रक चालकाचा गोंधळ
इराणी खणीजवळ प्रकार; वाहतुकीला अडथळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः इराणी खणीजवळ पहाटेपासून थांबलेल्या ट्रकने वाहतुकीला अडथळा केला. सकाळी दहाच्या सुमारास वाहतूक पोलिस घटनास्थळी आले. ट्रक बाजूला घेण्यास सांगताच हातात चाकू घेऊन चालक उतरला. नागरिकांनीही पहाटेपासून हातात चाकू, लाकडी दांडके घेऊन फिरणाऱ्या चालकाचा गोंधळ पाहिला होता. अखेर पोलिसांनी संबंधिताच्या नातेवाईकाला बोलावून त्याला ताब्यात दिले.
पुण्याहून आलेला ट्रक चालक रात्रीपासून इराणी खण परिसरात थांबून होता. तो पहाटेपासूनच ट्रकमधून खाली उतरायचा, काही वेळ भररस्त्यात येऊन लोकांना चाकू दाखवायचा. पुन्हा ट्रकमध्ये जाऊन बसायचा. याची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस या ठिकाणी आले. त्यांना हा प्रकार पाहून जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडूनही मदत मागवली. बराच वेळ त्याची समजूत घालून तो चालक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी त्याचा वाहनाच्या माहितीवरून नातेवाईकांशी व मालकाशी संपर्क साधला. यानंतर त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
चौकट
चालक नशेत की मनस्थिती बिघडली?
ट्रक चालकाची मनस्थिती अचानक बिघडली, की तो नशेत होता हे स्पष्ट झाले नाही. अशा परिस्थितीत तो मालाने भरलेला ट्रक घेऊन पुढे गेला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. त्याच्यावर वेळीच कारवाई झाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.