आसमा क्रिकेट चषक उत्साहात

आसमा क्रिकेट चषक उत्साहात

Published on

‘आसमा’ क्रिकेट चषकाची
उत्साहात सांगता

कोल्हापूर, ता. १६ : शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या ‘आसमा’ चषकाची सांगता झाली. स्पर्धेत कोल्हापूर व सांगली येथील माध्यम संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत आसमा कोल्हापूर संघाचा सोहम खासबारदार मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज ठरला, तर आसमा सांगली संघाचा सुधीर अनंतपूरकर उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
कोल्हापूर व सांगली येथील जाहिरात एजन्सी व विविध माध्यमे यांच्यामध्ये प्रतिवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. विजेत्या, उपविजेत्या संघांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पावसकर म्हणाले, ‘आसमाने अशा स्पर्धा वर्षातून दोन वेळा तरी आयोजित कराव्यात, त्यामुळे माध्यमकर्मींना रोजचे ताणतणाव झेलण्याचा शक्ती मिळेल. त्यासाठी आपणही सहकार्य करू.’
यावेळी भाजपचे प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल चौगुले, आसमा अध्यक्ष सुनील बासरानी, स्पर्धा समिती अध्यक्ष अमरसिंह भोसले, आसमा उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, काका पाटील, आसमाचे सर्व संचालक, सदस्य उपस्थित होते. विवेक मंद्रूपकर यांनी सूत्रसंचालन केले. आसमाचे सचिव संजीव चिपळूणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com