महापालिका शालेय क्रीडा स्पर्धेत ‘टेंबलाईवाडी विद्यामंदिर’ अव्वल’

महापालिका शालेय क्रीडा स्पर्धेत ‘टेंबलाईवाडी विद्यामंदिर’ अव्वल’

Published on

46110
कोल्हापूर ः महापालिका शालेय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेता ठरलेल्या टेंबलाईवाडी विद्यामंदिर संघाला महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते व प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थित चषक बक्षीस देण्यात आला.
...........
महापालिका शालेय क्रीडा स्पर्धेत
टेंबलाईवाडी विद्यामंदिर ‘अव्वल’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या महापालिका आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत टेंबलाईवाडी विद्यामंदिरने सर्वसाधारण विजेतेपद, तर शोभायात्रा स्पर्धेत लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरने पहिला क्रमांक पटकाविला.
शोभायात्रा स्पर्धेतील अन्य विजेत्यांमध्ये टेंबलाईवाडी विद्यामंदिर (दुसरा), यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर (तिसरा) यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.
विजेत्या शाळांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, महापालिका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, दिलीप माने, विलास पिंगळे, मनीषा पांचाळ, लक्ष्मण पवार, अजय गोसावी, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, संजयकुमार देसाई, किरण माळी, राहुल बागडे, अजित कानकेकर, मज्जीद नदाफ यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com