वृत्तपत्र चषक क्रिकेट
46432
कोल्हापूर ः वृत्तपत्र विक्रेता चषक क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण शास्त्रीनगर मैदानावर झाले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी.
.................
वृत्तपत्र विक्रेता चषक
क्रिकेट स्पर्धा आजपासून
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे शास्त्रीनगर येथील मैदानावर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला उद्या (गुरुवार) पासून प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर व सांगली येथील संघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये राजारामपुरी डेपो, भाऊसिंगजी रोड डेपो, मराठा बँक डेपो, कावळा नाका डेपो, संभाजीनगर डेपो आणि सांगली अशा सहा संघांचा समावेश आहे. स्पर्धा सलग दोन दिवस रंगणार आहे.
मंगळवारी सायंकाळी वृत्तपत्र विक्रेता चषक स्पर्धेतील चषकाचे अनावरण झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, अंकुश परब, सुरेश ब्रह्मपुरे, शहर संघटनेचे अध्यक्ष रवी लाड, संघटक शंकर चेचर, उपाध्यक्ष रणजित आयरेकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र चौगुले, राजारामपुरी संघटनेचे अध्यक्ष आसिफ मुल्लानी, संघटक रमेश जाधव, ग्रामीण उपाध्यक्ष संदीप ब्रह्मदंडे, स्पर्धा समितीप्रमुख सौरभ लाड, तंझिल अन्सारी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

