उचगाव येथे पालखी सोहळा

उचगाव येथे पालखी सोहळा

Published on

विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात

सांगवडेवाडी परिसरात पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम
सांगवडेवाडी : सांगवडेवाडी (ता. करवीर) परिसरात विविध स्पर्धा; सांस्कृतिक कार्यक्रम शिवज्योत मिरवणुकांनी उत्साहात झाली. सांगवडे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रूपाली कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मानसी पाटील यांची पोलिसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलिसपाटील नेमिनाथ माने, सचिन माने, सुकुमार जगनाडे यांची भाषणे झाली. सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते. संयुक्त हिंदवी स्वराज्य सांगवडे यांचे मार्फत मारूती चौक येथे उदयसिंह मोहिते व मच्छींद्र खोडदे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

वसगडे परिसर
ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी सरपंच योगिता बागडी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी, ग्रामसेविका संगीता बिरंबोळे यासह सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते. हलसवडे येथे सरपंच प्रज्ञा कांबळे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी ग्रामसेविका रोहिणी हावडा व ग्रामपंचायत सदस्य सेवकवर्ग उपस्थित होते. सांगवडेवाडी येथे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच गौराबाई खोचगे यांनी प्रतिमा पूजन केले. सरपंच सुदर्शन खोत, ग्रामसेवक राजकुमार खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. मराठा रियासत मंडळात माजी सैनिक महादेव खोचगे, सरपंच सुदर्शन खोत यांनी प्रतिमापूजन केले.

सांगवडेवाडी न्यू इंग्लिश स्कूल
माजी विद्यार्थी संदीप जाधव मुख्याध्यापक आर. आर. खोचगे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे श्रेया शिंदे, लावण्या खुडे, सिद्धी सूर्यवंशी, आरोही मिनेकर, वेदांत खुडे त्यांचे नंबर आले त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. शिवजयंतीनिमित्त ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिक्षक सेवक उपस्थित होते. जिजाऊ ज्ञान मंदिर प्राथमिक शाळा , मराठा रियासत यांनी मिरवणूक काढली. विविध वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी होते. सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे,वसगडे , परिसरातील प्राथमिक माध्यमिक शाळांनी गावात प्रभात फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मराठा रियासत, चॅलेंज ग्रुप तरुण मंडळाने पन्हाळगडावरून शिवज्योती आणल्या.

गोशिमा कार्यालय
गोकुळ शिरगाव : येथील गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील गोशिमा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात झाली. गोशिमाचे उपाध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, मानद सचिव संजय देशिंगे, खजिनदार अमोल यादव, संचालक दीपक चोरगे, नचिकेत कुंभोजकर, अनिरुद्ध तगारे, सल्लागार संचालक नितीनचंद्र दळवाई, मोहन पंडितराव, निमंत्रित संचालक विनयकुमार चौगुले, सेंटर ऑफ एक्सलन्सच्या भक्ती बदरा, गोशिमा व सेंटर ऑफ एक्सलन्सचे कर्मचारी उपस्थित होते.


उचगावला पालखी सोहळा
उचगाव : येथे काही मंडळांनी पन्हाळगडाहून शिवज्योत आणली. सायंकाळी छत्रपती शिवाजीनगर येथे पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर झाले. ग्रामपंचायतीतर्फे उचगाव फाटा परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच राहुल मोळे, सारिका माने, तलहा मणेर, तुषार पाटील, शीला मोरे, विनायक हावळ, विराग करी, श्रीधर कदम, अरविंद शिंदे, गुरुदेव माने, ग्रामसेवक गाढवे उपस्थित होते. शिवसेनेतर्फे बाल हनुमान तरुण मंडळात शिव प्रतिमेचे पूजन शरद माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू यादव, शिवानंद स्वामी, भाऊ चौगुले, आबा जाधव, दीपक रेडेकर, गंगाराम ढेरे, संजीव गाताडे उपस्थित होते. मणेर मळा येथे शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्रातर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. केंद्राच्या मुला-मुलींनी लाठीकाठी, लेझीम, दांडपट्टा, फरीगदगा व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी सुमेध सुनील हुद्दार यांचे व्याख्यान झाले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

वडणगेत पदयात्रेचे आयोजन
वडणगेतील देवी पार्वती माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कूल आणि केंद्रीय प्राथमिक शाळा कुमार व कन्या विद्यामंदिरतर्फे जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन केले होते. डी. एम. साखळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. तन्‍वी पाटील, दूर्वा जाधव, विदिशा बराले, सार्थकी भोसले, निकिता चव्हाण या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. पदयात्रा पार्वती चौकात आल्यानंतर पार्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्‍यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, लेझीम नृत्य सादर केले. मुख्याध्यापक आर. बी. देवणे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख शंकर पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com