

gad252.jpg 47570
इंचनाळ ः श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते झाले. शेजारी उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी.
ज्ञानाबरोबर कष्टाचाही ध्यास घ्या
प्रा. कुराडे ः ‘शिवराज’तर्फे इंचनाळला श्रमसंस्कार शिबिर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ ः श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वतःबरोबरच समाजाचाही विकास होतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराचे महत्त्व ओळखून ज्ञानाबरोबरच कष्टाचाही ध्यास घेतला पाहिजे, असे मत शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी व्यक्त केले.
इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथे शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी प्रा. कुराडे बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते.
ग्रामसेवक मारुती नांगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच उत्तम कांबळे, उपसरपंच कविता पाटील, विलास देशपांडे, उदय देसाई, सचिन पाटील, मनीषा पोवार, राजेंद्र देसाई, मुख्याध्यापिका सुनंदा होडगे, जनार्दन पाटील, डॉ. दीपक खेडकर, प्रा. किशोर अदाटे, संदीप कुराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. जी. गायकवाड यांनी स्वागत केले. प्रा. डी. यु. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.