सेंटर फॉर रेनेसाँचे उद्घाटन

सेंटर फॉर रेनेसाँचे उद्घाटन

Published on

फोटो 47666

सेंटर फॉर रेनेसाँचे उद्‌घाटन
कोल्हापूर, ता. २५ ः महाराष्ट्राच्या विविध विभागांतून आणि कर्नाटक-गोवा येथून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकसहभागातून उभा राहिलेल्या हेर्ले येथून सेंटर फॉर रेनेसाँ या संस्थेचे आज उद्‌घाटन झाले.
फातिमाबी हाशीम मनगोळी यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले. त्यानंतर सभा झाली. सतीश लोंढे म्हणाले, या सेंटरचे प्रमुख हुमायून मुरसल यांच्या समन्वयाने हे सेंटर आज महाराष्ट्रात समाजोपयोगी ज्या सामाजिक चळवळी सुरू आहेत, त्यांना जोडण्याचे काम करेल.’ कार्यकर्त्यांची दोन गटांत विभागणी करून चर्चा झाली. यावेळी नंदुरबार, मुंबई, पुणे, ठाणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्गसह बेळगाव व गोव्यातून सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रेहाना मुरसल, धनाजी गुरव, मेघा पानसरे, मंजुश्री पवार, अविनाश भाले (कोल्हापूर), विक्रम कान्हेरे, रंजना कान्हेरे (नंदुरबार), दिलीप नाईक (बेळगाव), अंकुश कदम, महेश पेडणेकर (सिंधुदुर्ग), राजेंद्र साठे, योगेश कुदळे (मुंबई), समीर शेख, हिना खान, इब्राहिम खान, कलीम अजीम (पुणे) उपस्थित होते. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com