आजरा ः कलशारोहण सोहळा उत्साहात
ajr262. jpg... 47825
पेरणोली (ता. आजरा) ः गावातून निघालेली भावेश्वरी मंदिराचा कलश व नंदीची मिरवणूक.
भावेश्वरी मंदिराचे
पेरणोलीत कलशारोहण
महादेव मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना
आजरा, ता. २६ ः पेरणोली येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा झाला. ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या प्रांगणातील भावेश्वरी मंदिराचा कलशारोहण झाले. महादेव मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना झाली. विविध धार्मिक कार्यक्रम झाले. महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नंदी व कलशाची गावातून वाद्याच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. यात डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांचा मोठा सहभाग होता. रवळनाथ मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातील विविध चौकांतून मिरवणूक महादेव मंदिराजवळ आली. महादेव मंदिराच्या प्रांगणात सांगता झाली. महादेव मंदिर रुद्राभिषेक व भावेश्वरी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. उपवासाच्या प्रसादाचे वाटप झाले. पौराहित्य सोमनाथ भातखंडे व सहकाऱ्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

