गड- अवैध उत्खनन
GAD261.JPG
47846
गडहिंग्लज ः चंदगड तालुक्यातील अवैध उत्खनन थांबवावे या मागणीचे निवेदन शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिले.
अवैध उत्खननामागचा ‘गॉडफादर’ शोधा
चंदगड तालुका ः ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाची प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ ः चंदगड तालुक्यातील काही गावच्या हद्दीत अवैध बॉक्साइटचे उत्खनन सुरू आहे. छुप्या पद्धतीने हे उत्खनन व वाहतूक सुरू असून, निसर्ग संपन्नतेवर घाव घालणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवण्याच्या या प्रकारामागे गॉडफादर कोण आहे याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली. शिष्टमंडळाने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. याकडे सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेने लक्ष वेधले होते. त्यानंतर राजगोळी बुद्रुक येथे खनिज वाहतूक करणारे दहा डंपर जप्त केले होते. यावरून अवैध उत्खनन होत असल्याचे स्पष्ट झाले होते; परंतु प्रशासनाने कोणती ठोस कारवाई केली हे गुलदस्त्यात आहे. कारवाईनंतर छुप्या पद्धतीने अवैधपणे उत्खनन सुरू आहे. आंबा व काजू पिकालाही भविष्यात धोका आहे. प्रशासनाने जुजबी कारवाई करून स्वस्थ न बसता कडक कारवाई करावी. अन्यथा शिवसेनाच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून चंदगडचा निसर्ग संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशाराही दिला. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, दिलीप माने, प्रकाश रावळ, अवधूत पाटील, वसंत नाईक, युवराज पोवार, जयसिंग टिकले आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
चौकट
कुठे होत आहे उत्खनन?
जंगमहट्टी धरणाचा दक्षिण परिसर, माडवळे, हाजगोळी, म्हाळुंगे, कोलिक, इब्राहिमपूर, चितळे, हिंडगाव या भागांत बॉक्साइटचे उत्खनन सुरू असल्याचे समजते. त्यामुळे हिरवाईने नटलेला चंदगड तालुका खाण माफियांकडून उजाड करण्याचा प्रयत्न आहे. चौकशीनंतर हे उत्खनन बंडिंगसाठी केले जात असल्याचे उत्तर दिले जात असल्याचेही शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

