गड- सेंद्रीय शेती

गड- सेंद्रीय शेती
Published on

GAD262.JPG 47847
भडगाव ः सेंद्रिय शेती प्रशिक्षक तानाजी निकम यांचा सत्कार चंद्रशेखर मोळदी यांच्याहस्ते झाला. यावेळी डॉ. डी. व्ही. घेवडे, अरुण खोत, किरण मोर्ती उपस्थित होते.

सेंद्रिय शेती करा, पोत सुधारा : निकम
गडहिंग्लज, ता. २६ : परिसरातील नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती करावी. यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पोतही सुधारतो, असे आवाहन कणेरी मठाच्या विज्ञान केंद्राचे तानाजी निकम यांनी केले.
तालुका कृषी विभाग व अॅड. श्रीपतराव शिंदे कृषी सहायता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर ते बोलत होते. भडगावच्या डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात हे प्रशिक्षण झाले.
निकम म्हणाले, ‘सेंद्रिय पद्धतीने शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांचा उठाव आता गरजेचा बनला आहे. उंबर झाडांच्या मुळांपासून औदुंबर जल तयार करा. त्यात पशूधनाची वार वापरून रसायन तयार करता येते. त्याची फवारणी पिकांवर करता येते. जमिनीचा पोत टिकवण्यासाठी केवळ ताग, धैंचाचा या हिरवळींच्या खताचा वापर न करता त्यासाठी चवळी, गवार, मका, नाचणी एकत्रित करून चांगले हिरवळीचे खत तयार होऊ शकते.
औदुंबर जल, गोमूत्र, सेंद्रिय गूळ वापरून अत्यंत कमी खर्चात घरच्या घरी सर्व सेंद्रिय औषधे तयार करण्याची पद्धत सांगितली. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे प्रमुख उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक अरुण खोत, किरण मोर्ती, कृषी सहायक अनिल कांबळे, सेंद्रिय शेती मिशन गटाचे अध्यक्ष चंद्रशेखर मोळदी आदी उपस्थित होते. अॅड. श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहासह चंद्रकांत कोडोली, विद्याधर गुरव यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com