गड- क्रिएटीव्हमध्ये व्याख्यान
GAD263.JPG 47848
गडहिंग्लज ः क्रिएटिव्ह प्रशालेत व्याख्यान उद्घाटनप्रसंगी आण्णासाहेब बेळगुद्री, युवराज पाटील, डॉ. चंद्रशेखर देसाई, दिनकर रायकर आदी.
पालकांनी पहिल्यांदा संस्कारशील
व्हावे ः प्रा. युवराज पाटील
गडहिंग्लज, ता. २६ : मुलांना संस्कारशील करायचे असेल तर सर्वप्रथम पालकांनी संस्कारशील असणे आवश्यक आहे. त्यामुळे कुटुंबातील संवाद व लहान गोष्टींमध्ये मुलांना निर्णय घेण्याची संधी देणे त्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची असते, असे प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले.
येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व सायन्स कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित ‘मुलांचे पालक व्हा, मालक नको’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव आण्णासाहेब बेळगुद्री, उपाध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, मुख्याध्यापक दिनकर रायकर, डॉ. सुषमा देसाई, डॉ. सविता बेळगुद्री यांची प्रमुख उपस्थिती होती. समर्पिता शिरगावकर यांनी स्वागत केले. स्नेहा पारधे यांनी सूत्रसंचालन केले. शीला पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

