शिवनेरी स्पोर्टस ‘क’, प्रकाश फौंडेशन''ब’ बाद फेरीत

शिवनेरी स्पोर्टस ‘क’, प्रकाश फौंडेशन''ब’ बाद फेरीत
Published on

शिवनेरी स्पोर्टस्‌ ‘क’, प्रकाश फौंडेशन''ब’ बाद फेरीत
मेजर यादव टी-२० ‘क’ गट क्रिकेट स्पर्धा; यशराज, हर्षवर्धन, सुशीलकुमार चमकले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ ः ‘केडीसीए’ आयोजित मेजर यादव टी-२० ‘क’ गट क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी स्पोर्टस्‌ ‘क’ ने रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीचा, तर प्रकाश फौंडेशन ''ब’ ने श्री स्पोर्टस्‌ असोसिएशन ‘अ’चा पराभव करीत बाद फेरीत प्रवेश केला.
राजाराम मैदानावर आज पहिला सामना शिवनेरी स्पोर्टस्‌ व रमेश कदम क्रिकेट ॲकॅडमीत झाला. प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने २० षटकांत ५ बाद २४५ धावा केल्या. यात यशराज गायकवाडने ८३, हर्षवर्धन जाधव ५८, प्रसाद उगवे याने नाबाद ५१ धावा केल्या. रमेश कदम संघाकडून हर्ष डिसनेने २, विजयराज निंबाळकर, रेहान शहा व अखिलेश यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना कदम संघास हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव २० षटकांत ७ बाद ११४ धावांत गुंडाळला. यात अमन यादवने नाबाद २०, अंकिता भारतीने १८, विधान कोष्टी १७, आदित्य बोरा १६, रेहान शहा याच्या १४ धावांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना शिवनेरी संघाकडून भेदक गोलंदाजी करताना प्रसाद उगवे, पलाश पाटील यांनी प्रत्येकी दोन, तर हर्षजित पाटील, यशराज गायकवाड यांनी प्रत्येकी एक गडी बाद करीत सामना १३१ धावांनी सामना जिंकला.
दुसऱ्या सामन्यात प्रकाश फौंडेशनने श्री स्पोर्टस्‌ क्रिकेट असोसिएशनवर ६ गडी राखून मात केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्री स्पोर्टस्‌ क्रिकेट असोसिएशनने २० षटकांत ८ बाद १२४ धावा केल्या. यात सुशीलकुमार माने ५३, वीर देसाई २९, तुकाराम खोंद्रे २० धावा केल्या. प्रकाश फौंडेशनकडून वर्जकुमार धुळासावंत, शुभम कुरणे यांनी प्रत्येकी दोन, तर कार्तिक पाटील, ओमकार पवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना प्रकाश फौंडेशनने १६ षटके १ चेंडूंत १बाद १२८ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामध्ये अर्णव पाटील ४६, सर्वेश वणकुद्रे ३९ व महादेव पवार याच्या नाबाद २६ धावांचा समावेश आहे. श्री स्पोर्टस्‌कडून वीर देसाई, तुकाराम खोंद्रे, संदीप जाधव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हा सामना प्रकाश फौंडेशनने सहा गडी राखून जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com