मे नाही मार्चपासूनच काळ्याकोटला सुट्टी...

मे नाही मार्चपासूनच काळ्याकोटला सुट्टी...

Published on

वकील विनाकाळाकोट आता
चार महिने न्यायालयात येऊ शकतात

बार कौन्सिलचा निर्णय ः अधिक उष्‍म्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.४ ः पुढील चार महिने आता वकील न्यायालयात काळा कोट न परिधान करता येऊ शकतात. उन्हाळ्यानिमित्त हा निर्णय झाला आहे. पूर्वी ही सूट केवळ मे आणि जून या दोन महिन्यांसाठीच होती. आता १ मार्च ते ३० जूनपर्यंत ही सूट वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे.
वकिलांना न्यायालयात ड्रेस कोड मध्येच हजर रहावे लागते. वकिलांना काळ्या कोटमुळे प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागतो. त्यातून अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. अलीकडे राज्यातील दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. त्यामुळे नागरिक काळे कपडे घालणे टाळताना दिसतात. मात्र, वकीलांना न्यायालयात काळा कोट घालणे बंधनकारक असते. त्यामुळे काळाकोट घालून न्यायालयात हजर राहणे वकिलांना असहाय्य होते. याचा विचार करून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com