कोल्हापूरवासीयांची जून पर्यंत भागणार तहान ! : धरणे, तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा
कोल्हापूरवासीयांची जूनपर्यंत भागणार तहान !
धरणे, तलावांमध्ये पुरेसे पाणी; सरासरी ६६.४४ टक्के साठा शिल्लक ‘जलसंपदा’कडून नियोजन
प्रवीण देसाई ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याच्या उन्हाळी पाळक (रोटेशन)चे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. सध्या जिल्ह्यातील चार मोठी धरणे, ११ मध्यम प्रकल्प व ५६ तलावांमध्ये एकूण सरासरी ६६.४४ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ६१.९७ टक्के इतका होता. सध्याचा पाणीसाठा पुरेसा आहे. हे पाणी कोल्हापूरकरांची तहान जूनपर्यंत भागवेल, असा अंदाज आहे. त्यानुसार या विभागाने शेती व पिण्याचे पाणी याबाबत नियोजन केले आहे.
उन्हाच्या झळा बसू लागल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न समोर आला आहे. गतवर्षी पाण्याची टंचाई लवकरच जाणवल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत होते; परंतु यंदा गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील धरणे व तलावांमध्ये पुरेसे पाणी असल्याचे चित्र आहे. गतवर्षी रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील धरणे व तलावांमधून ५.२ टी. एम. सी. पाणी जलसंपदा विभागाकडून सोडले होते. तेव्हा पाऊस कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातच पाणी घ्यायला सुरुवात झाली होती; परंतु यंदा चांगला पाऊस झाल्याने पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी कमी सोडले असून, ३.६४ टी. एम. सी. पाणी घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाणी लागले आहे. त्यामुळे पाणी जादा शिल्लक राहिले आहे. या पाण्याचे शेतीसाठी व पिण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे हे पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे.
चौकट
रब्बी पाळक असे...
जलसंपदा विभागाकडून रब्बी हंगामाचे १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत आठ पाळक (रोटेशन)चे नियोजन केले. या हंगामात १७ दिवसांचे पाळक असते. यामध्ये नऊ दिवस धरणांमधून पाणी सोडले जाते. त्यानंतर या सोडलेल्या पाण्यातून पुढे आठ दिवस उपसा केला जातो. हे पाणी पंचगंगा नदीवरील आहे.
चौकट
उन्हाळी पाळक असे...
उन्हाळी हंगामाचे १ मार्च ते १० जूनपर्यंत सहा पाळक (रोटेशन)चे नियोजन केले आहे. या हंगामात १७ दिवसांचे पाळक असते. यामध्ये नऊ दिवस धरणांमधून पाणी सोडले जाते. त्यानंतर या सोडलेल्या पाण्यातून पुढे आठ दिवस उपसा केला जातो.
चौकट
५६ तलावांमध्ये सरासरी ६४.३८ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील ५६ तलावांमध्ये सद्यस्थितीत एकूण १३४.३९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६४.३८ टक्के इतके आहे. गतवर्षी या तलावांमध्ये १२४.९४ टी. एम. सी. इतका पाणीसाठा होता. हे प्रमाण ५९.८५ टक्के इतके होते.
कोट
जिल्ह्यातील धरणे व तलावांमध्ये आतापर्यंत पुरेसा पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाकडून शेती व पिण्याचे पाणी याबाबत योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे हे पाणी जूनपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही.
- स्मिता माने, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
....................................
दोन्ही चौकट समोरासमोर लावा
चौकट
*यावर्षीचा धरणातील पाणीसाठा
*धरणे* पाणीसाठा (टीएसमी)*टक्केवारी
*राधानगरी*१७०.४४*७२
*तुळशी*७६.२७*७८
*दूधगंगा*३८२.४६*५३
*वारणा *६८५.९५*७०
*कासारी*५२.८१*६७
*कडवी*५४.१२*७६
*कुंभी*५५.९९*७३
*पाटगाव*७३.८१*७०
*चिकोत्रा*३०.९६*७२
*चित्री*३७.७३*७१
*जंगमहट्टी*२५.४१*७३
*घटप्रभा*३१.८७*७२
*जांबरे*१८.१५*७८
*आंबेओहोळ*३१.१७*८९
*सर्फनाला*१३.१८*६९
.........................................
चौकट
*गतवर्षीचा धरणातील पाणीसाठा
*धरणे* पाणीसाठा (टीएसमी)*टक्केवारी
*राधानगरी*१५१.०७*६४
*तुळशी*६७.०४*६८
*दूधगंगा*३९२.०१*५५
*वारणा *६१६.९२*६३
*कासारी*५६.२७*७२
*कडवी*५१.२४*७२
*कुंभी*५८.२७*७६
*पाटगाव*७२.१९*६९
*चिकोत्रा*२३.५९*५५
*चित्री*३५.३९*६६
*जंगमहट्टी*२०.५६*५९
*घटप्रभा*३३.९९*७७
*जांबरे*१६.९४*७३
*आंबेओहोळ*२८.२२*८०
*सर्फनाला*--*--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

