‘सीआयआय’ची आज वार्षिक सभा

‘सीआयआय’ची आज वार्षिक सभा

Published on

‘सीआयआय’ची
आज वार्षिक सभा

कोल्हापूर ः कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्‍ट्रिजच्या (सीआयआय) दक्षिण महाराष्ट्र विभागाची वार्षिक सभा उद्या, बुधवारी सायंकाळी सहा वाजता रेसिडेन्सी क्लबमध्ये होणार आहे. त्यासाठी निर्लेप कुकवेअर आणि छत्रपती संभाजीनगरमधील एआयटीजीचे अध्यक्ष राम भोगले, गॅलिडिअन्सचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. अणदूरकर प्रमुख उपस्थित असणार आहेत. सभेत ‘सीआयआय’च्या दक्षिण महाराष्ट्र विभागाचे मावळते अध्यक्ष अजय सप्रे यांच्या कारकिर्दीतील कामगिरीचा अहवाल सादर करणार आहेत. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर भोगले हे ‘औरंगाबाद फर्स्ट मॉडेल फॉर डेव्हलपमेंट ऑफ लोकल इंडस्‍ट्रिज’ याविषयावर, तर अणदूरकर हे ‘एआय अँड इमर्जिंग बिझनेस ऑर्पच्युनिटीज’ याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष सारंग जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com