

कामाचे पैसे
मागितल्यावरून
मारहाण; चौघांवर गुन्हा
कोल्हापूर ः कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून भैरू मारुती तारीहाळकर (वय ३८ रा. पाचगाव, मूळ रा. बेळगाव) यांना झालेल्या मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला. भुजंग पाटील, जोती पाटील, माया ऊर्फ अर्पिता पाटील याच्यासह एका अनोळखीवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
गवंडी काम करणाऱ्या भैरू ताळीहारकर यांनी भुजंग पाटील यांच्या घराचे काम केले होते. याचे पैसे मागण्यासाठी सोमवारी ते पाटील याच्याकडे गेले होते. यावेळी पैशांवरून दोघांत वादावादीचा प्रकार घडला. यातून चिडून त्यांना चौघांनी लोखंडी गज, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत ताळीहारकर यांचा मेहुणा विक्रांत चौगुलेही जखमी झाला.
........................
भाजून जखमी
झालेल्या वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर ः वाळवेकरवाडी (ता. पन्हाळा) येथे उसाचे खोडवे पेटविताना भाजून जखमी झालेले बापू धोंडी कुंभार (वय ७७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २३ फेब्रुवारीला घडलेल्या घटनेनंतर त्यांना कळेतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार घेताना बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. तिथून त्यांना सीपीआरमध्ये आणले असता उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. एका घटनेतून सावरताना दुसऱ्या घटनेत ते पुन्हा जखमी होऊन त्यातच मृत्यू झाला.
.................
दुचाकी घसरून
वृद्ध जखमी
कोल्हापूर ः टाकाळा ते कमला कॉलेज रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने कृष्णात महादेव माळी (वय ७५, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) जखमी झाले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.