‘उत्तरेश्वर प्रासादिक’ पुढील फेरीत
49153
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध बालगोपाल तालीम यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यातील क्षण (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
...........
लोगो ः सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
‘उत्तरेश्वर प्रासादिक’ पुढील फेरीत
बालगोपाल तालीम मंडळवर एकतर्फी मात ः आठ जणांना यलो कार्ड
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः रोहित भोसले, शुभम जाधव यांच्या गोलच्या जोरावर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळने तुल्यबळ बालगोपाल तालीम मंडळचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यात एकूण आठ खेळाडूंना पंचांनी ‘यलो कार्ड’ दाखविले.
छत्रपती शाहू स्टेडीयमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज या दोन संघांत सामना रंगला. सुरुवातीपासून बालगोपाल तालीम मंडळने सूत्रबद्ध खेळ करण्यास सुरुवात करीत ‘उत्तरेश्वर’ संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तरेश्वरकूडून नयन सूर्यवंशी, स्वराज पाटील, तुषार पुनाळकर, मयूर कदम, शुभम जाधव यांनी खोलवर चढाया करीत हा दबाव झुगारून लावला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघ गोल करून आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. सामन्यांच्या ५० व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या शुभम जाधवने दिलेल्या पासवर रोहित भोसलेने गोल करीत संघाला एक विरुद्ध शून्य अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर बालगोपालकडून ऋतुराज पाटील, सागर पोवार, रोहित कुरणे, प्रथमेश जाधव, एल टिमॉन, लोयमगमबा सिंग यांनी जोरदार चढाया करीत सामना बरोबरीत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. उलट उत्तरेश्वर संघाचा खेळ उत्तरोत्तर बहरत गेला. सामन्याच्या ८० मिनिटे अधिक जादा वेळेत मोठ्या गोलक्षेत्राबाहेरून मारलेल्या थेट फटक्यावर गोल करीत संघाची आघाडी दोन विरुद्ध शून्य अशी भक्कम केली. दरम्यान, शुभम जाधवने मोठ्या गोलक्षेत्राबाहेरून मारलेला फटका गोलपोस्टला तटून बाहेर गेला. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम ठेवत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघाने सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.
...........
आठ जणांना यलो कार्ड
मयूर कदम, सिद्धेश भाट, स्वयंम भोसले, दिग्विजय वाडेकर, स्वयंम गिराजी (उत्तरेश्वर), प्रथमेश जाधव, लोयमगमबा सिंग, रोहित कुरणे (बालगोपाल) यांना पंचांनी धसमुसळ्या खेळाबद्दल यलो कार्ड दाखविले.
.....
केएसए ‘बी’ डिव्हिजन निकाल असा
मंगळवार पेठ फुटबॉल क्लबने कोल्हापूर पोलिस संघाचा ४ विरुद्ध १ असा टायब्रेकरवर पराभव केला, तर सुभाषनगर फुटबॉल क्लबने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा ४ विरुद्ध १ असा पराभव केला. सोल्जर्स क्लबने राजे संभाजी तरुण मंडळचा ३ विरुद्ध १ असा पराभव केला. मर्दानी खेळाचा आखाडा संघाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला.
.....
आजचा सामना
दुपारी ४ वा. ः दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

