पाणी टंचाई आराखडा

पाणी टंचाई आराखडा
Published on

जिल्हा परिषद लोगो

पाणी टंचाईग्रस्त गावांना सांभाळा
६५ गावे व ९८ वाड्यांना झळ बसण्याची शक्यता, जिल्हा परिषदेकडून आराखडा तयार

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : यंदा जिल्ह्यातील एप्रिल ते जून अखेर ६५ गावे, तर ९८ वाड्यांना संभाव्य पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ६७ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. टंचाईग्रस्त गावे व वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन असून, जानेवारी ते मार्चमधील टंचाईग्रस्त गावांचा आकडा २७, तर वाड्यांचा ६० होता. त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. टंचाईग्रस्त गावांसाठी सुमारे २०५ लाख ८१ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांचा अंदाज घेत जिल्हा परिषदेतर्फे आकडा निश्‍चित केला जातो. गावांचे सर्वेक्षण होऊन सार्वजनिक विहिरींतील गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, प्रगतिपथावरील नळ योजना गतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहिरी खोदणे, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, अशा उपाययोजना आखल्या जातात. त्यानुसार योजनांसाठी आराखडा तयार केला आहे.
जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान संभाव्य टंचाईग्रस्त २७ गावे व ६० वाड्या गृहीत धरण्यात येऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता ८७ प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठीचा खर्च अंदाजे ७७ लाख २१ हजार रुपये निश्‍चित केला आहे. एप्रिल ते जून २०२५ अखेर १६३ उपाययोजना केल्या जाणार असून, त्यासाठी २०५ लाख ८१ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
--------------------
* टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या
* जानेवारी ते मार्च २०२५ * एप्रिल ते जून २०२५
* तालुका * गावे * वाड्या * गावे * वाड्या
* आजरा * १ * ३ * १ * ३
* भुदरगड * - * - * २ * ७
* चंदगड * २ * १२ * ५ * १७
* गडहिंग्लज * ११ * २ * ३ * -
* गगनबावडा * - * - * ९ * २१
* हातकणंगले * - * - * १२ * २
* करवीर * ५ * २ * ११ * ४
* कागल * - * - * - * -
* पन्हाळा * ३ * ८ * ११ * २०
* राधानगरी * २ * १९ * - * ८
* शाहूवाडी * - * १४ * २ * ११
* शिरोळ * ३ * - * ३ * -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com