

थेट पाईपलाईन योजना
दोन दिवस राहणार बंद
दुरुस्तीसह क्रॉस कनेक्शनचे काम
कोल्हापूर, ता. ९ ः : देखभाल-दुरुस्ती तसेच क्रॉस कनेक्शनच्या कामानिमित्त उद्यापासून दोन दिवस (ता. १०, ११) महापालिका थेट पाईपलाईन योजना बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सी, डी वॉर्ड वगळता उर्वरित शहराचे पाणी बंद राहणार आहे.
थेट पाईपलाईन योजनेची देखभाल दुरुस्ती व अमृत योजनेवरील मुख्य वाहिनीवरील क्रॉस कनेक्शनची कामे सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी थेट पाईपलाईन योजना बंद ठेवण्यात येणार असल्याने त्यावर अवलंबून शहरातील भाग, संलग्न उपनगर, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारीही (ता. १२) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. बालिंगा योजना मात्र सुरू राहणार असल्याने सी व डी वॉर्डमधील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.