पाटाकडील तालीम ‘अ’ उपांत्य फेरीत

पाटाकडील तालीम ‘अ’ उपांत्य फेरीत
Published on

50455
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्या सामन्यातील क्षण.(मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
......................
लोगो ः सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

पाटाकडील तालीम ‘अ’ उपांत्य फेरीत

संध्यामठ तरुण मंडळचा एकतर्फी धुव्वा ः ऋषिकेश मेथे-पाटील ‘सामनावीर’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ऋषिकेश मेथे-पाटीलच्या हॅटट्रिकच्या जोरावर यजमान पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने संध्यामठ तरुण मंडळचा पाच विरुद्ध शून्य अशा गोलफरकाने धुव्वा उडवित स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासून पाटाकडील तालीम मंडळचे सामन्यावर वर्चस्व राहिले. सामन्याच्या सातव्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार मोरेने निवृत्ती पावनोजीच्या पासवर गोल करीत संघाला एक विरुद्ध शून्य अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘संध्यामठ’कडून कपिल शिंदे, सिद्धेश साठे, श्रेयस मार्लेकर, यशराज जांभळे, देवराज जाधव यांनी सामना बरोबरीत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; पण पाटाकडीलच्या सजग बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. उलट सामन्याच्या २४ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने अंशिद अलीच्या पासवर गोल करीत संघाची आघाडी दोन विरुद्ध शून्य अशी वाढविली. त्यानंतर ३२ व्या मिनिटाला त्याने संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. त्यानंतर २६ व्या मिनिटाला निवृत्ती पावनोजीने मारलेला चेंडू गोलपोस्टला धडकून मागे आला. तो चेंडू ऋषिकेशने अलगद गोल जाळ्यात धाडला आणि त्याचा वैयक्तिक तिसरा आणि संघाचा चौथा गोल फलकावर लागला.
उत्तरार्धात पाटाकडील संघ आणखी गोल करून मोठ्या गोलफरकाने सामना जिंकेल असे प्रेक्षकांना वाटत होते. मात्र, संध्यामठकडून शॉर्ट पासिंगवर भर देण्यात आला. त्यामुळे आघाडी कमी करण्यासाठी गोल करण्याची संधी आली होती. मात्र, गोलरक्षक आणि बचावफळीमुळे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर ओंकार पाटीलने गोल करीत संघाची आघाडी पाच विरुद्ध शून्य अशी भक्कम केली. पाटाकडीलने अखेरपर्यंत हीच आघाडी कायम ठेवत सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
................
आजचा पहिला उपांत्य सामना
दु. ४ वा. ः खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ
..........
केएसए ‘बी’ डिव्हिजन सामने
बावडा फुटबॉल क्लब ‘अ’ने उमेश कांदेकर युवा मंचचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात साईनाथ स्पोर्टस् व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘ब’ यांच्यातील लढत दोन विरुद्ध दोन अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यात साईनाथ स्पोर्टसने हा सामना तीन विरुद्ध शून्य गोलने जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com