‘शिवनेरी’, ‘पोलाईट’ची विजयी सलामी

‘शिवनेरी’, ‘पोलाईट’ची विजयी सलामी

Published on

50484
कोल्हापूर ः शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजित आमदार चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी बाळ पाटणकर, संजय शेटे, आनंद माने, मधू बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
..............
‘शिवनेरी’, ‘पोलाईट’ची विजयी सलामी

आमदार चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा ः बाजारी, नाईक ठरले ‘सामनावीर’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः आमदार राजेश क्षीरसागर व शांद फाउंडेशनतर्फे आयोजित आमदार चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी स्पोर्टसने शाहूपुरी जिमखाना संघाचा, तर पोलाईट क्लबने फायटर्स स्पोर्टस् क्लबचा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
शाहूपुरी जिमखाना मैदानावर पहिला सामना शिवनेरी स्पोर्टस व शाहूपुरी जिमखाना संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी स्पोर्टसने २० षटकांत ९ बाद १५३ धावा केल्या. यात अभिजित लोखंडेच्या ३७, आदर्श माळीच्या २८, सोरभ काटेच्या १७ धावांचा समावेश होता. शाहूपुरीकडून विवेक बसर्गीने तीन, कार्तिक श्रीवास्तव व सूरज जाधव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी जिमखाना संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ ९९ धावांत गुंडाळला. यात अविनाश काटकर, विवेक बसर्गी यांनी प्रत्येकी २२ धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजी करताना शिवनेरीकडून प्रथमेश बाजारीने भेदक गोलंदाजी करीत चार गडी बाद केले. हा सामना शिवनेरी स्पोर्टसने ५४ धावांनी जिंकला. या सामन्यात प्रथमेश बाजारीला ‘सामनावीर’चा बहुमान देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात सांगलीच्या पोलाईट क्लबने फायटर्स क्लबचा ५६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पोलाईट संघाने २० षटकांत ७ बाद १९१ धावा केल्या. त्यात सागर कोरेने ५१, जीवन घोटणेने २७, सुशील बुर्लेने २४ धावा केल्या. गोलंदाजी करताना फायटर्सकडून दर्शन निंबाळकर व शुभंकर माने यांनी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना फायटर्स क्लबचा २० षटकांत डाव ७ बाद १३५ धावांत आटोपला. यात मंथन पाटीलने नाबाद ५१ धावांचे, तर पार्थ गंधवालेने २८ धावा केल्या. पोलाईटकडून भेदक गोलंदाजी करत स्वप्नील नाईकने चार, स्वप्नील बोर्लेने दोन गडी बाद केले. हा सामना पोलाईट संघाने ५६ धावांनी जिंकला.
स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ज्येष्ठ क्रिकेटपटू मधू बामणे, ज्येष्ठ क्रिकेट पंच शिवाजी कामते, प्रसाद मिराशी, राजाराम कुलकर्णी, अनिल शिंदे, आनंद माने, संग्राम पाटील, चंदू धामणे, अजित शिंदे, रणजित इंदुरकर, प्रकाश माजगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com