एनआयई देऊया पंखांना भरारी

एनआयई देऊया पंखांना भरारी

Published on

लोगो - एनआयई

फोटो 50828
शालेय जीवनातच ध्येय निश्चित करा
महेश शेटे : आदर्श प्रशालेत ‘एनआयई’तर्फे ‘देऊया पंखाना भरारी’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : आपले ध्येय शालेय जीवनातच निश्चित करून त्यादृष्टीने स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा,’ असा संदेश ऋषी कुलम चॅरिटेबल ट्रस्टचे महेश शेटे यांनी दिला. ‘सकाळ’च्या एनआयई व्यासपीठातर्फे आदर्श प्रशालेत महिला दिननिमित्त ‘देऊया पंखाना भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती पूजनाने झाले. शेटे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांचे महत्त्‍व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. पालकांसोबत कसे वागावे, प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवावा, नातेसंबंध दृढ कसे करावेत, याबाबत त्यांनी मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी माता पालक उपस्थित होते. यावेळी निसर्गाची काळजी व स्वच्छता घेण्याचे वचन घेण्याची शपथ घेतली.
योगा थेरपिस्ट डॉ. स्मिता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम व ध्यान करून घेतले. त्या म्हणाल्या, ‘निसर्गात एक नाद भरून आहे, तसाच तो आपल्या शरीरातही आहे. या नाद लहरी आपल्याला ध्यानात लागणाऱ्या एकाग्रतेसाठी सहायक ठरतात.’ यावेळी लता देशमुख आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख श्रद्धा चव्हाण यांनी करून दिली. सूत्रसंचालन समीक्षा आलुगडे यांनी केले. श्रेया हैबती यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com