

50928
डॉ. रवींद्र चव्हाण
..........
खेळाडूंनो, उत्तेजक द्रव्यापासून सावधान
डॉ. रवींद्र चव्हाण ः शिवराजमध्ये स्पोर्टस् न्यूट्रीशन-डोपिंगवर कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ ः ‘खेळ आणि उत्तेजक द्रव्य यांचे तयार झालेले नाते खेळाडूंच्या करिअरच्या दृष्टीने चांगले नाही. खेळातील शक्ती टिकून राहण्यासाठी उत्तेजक द्रव्य घेण्याची फॅशन तयार झाली आहे. खेळाडू नैसर्गिक शक्तीला मागे सारून कृत्रिम शक्तीला अंगीकारत आहेत. ही फार मोठी चूक आहे. उत्तेजक द्रव्याने करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. एक चांगला खेळाडू व्हायचे असेल तर सर्वांनी नैसर्गिक खेळ मजबूत केला पाहिजे,’ असे मत डॉ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील शिवराज महाविद्यालयात ‘स्पोर्टस् न्यूट्रिशन आणि डोपिंग’ विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. दुसऱ्या सत्रात प्रा. तंझीला काझी यांनी, खेळाडूंनी योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेड, जीवनसत्त्वांचा आहार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव डॉ. कुराडे व उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास संचालिका बिनादेवी कुराडे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. रंगराव हेंडगे, डॉ. गणपत गायकवाड, डॉ. दीपक खेडकर, डॉ. ए. जी. हारदारे, प्रा. विकास अतिग्रे, डॉ. एन. एम. मासाळ, प्रा. सुरेश धुरे, प्रा. कांचन बेल्लद आदींसह गडहिंग्लज, आजरा व चंदगड विभागातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. एन. बी. एकिले यांनी स्वागत केले. डॉ. राहुल मगदूम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किशोर आदाटे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.