महाराष्ट्र बॅंक कर्मचारी धरणे आंदोलन

महाराष्ट्र बॅंक कर्मचारी धरणे आंदोलन
Published on

फोटो 50951

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचे धरणे
कोल्हापूर, ता. १२ ः ‘आवाज दो हम एक है,’ ‘कामगार एक जुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत आज महाराष्ट्र बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कावळा नाका येथील विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन त्यांनी बॅंकेचे विभागीय व्यवस्‍थापक के. स्मीता दुर्गा यांना दिले. १७ मार्चला पुण्यातील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन होईल, त्यानंतर २० मार्चला देशव्यापी बंद असेल, अशी माहिती बॅंकेच्या कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस उमेश खोत यांनी दिली.
महाराष्ट्र बँकेने तत्काळ योग्य कर्मचारी मूल्यांकन करून पुरेशी लिपिक तसेच उप-कर्मचाऱ्यांची भरती करावी. ताब्यात घेतलेले युनियन कार्यालय परत करावे, द्विपक्षीय वाटाघाटी पुर्ववत करणे यासारख्या प्रलंबित मागण्यांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलन झाले. कामाचा ताण वाढत आहे, उलाढाल वाढत आहे. त्या प्रमाणात कर्मचारी कमी आहेत. त्यांची भरती तत्काळ करावी यासह अन्य मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन बॅंकेचे कामकाज सांभाळून केल्याचे खोत यांनी सांगितले.
आंदोलनात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये सुरज डांगे, सचिन जाधव, हेमंत कदम, जीवन करवीरकर, धीरज कुराडे, पुजा जाधव, सुरज फाळके, चेतन लाड, विश्‍वजीत कुलकर्णी, मुन्ना शेख, अवधुत कुलकर्णी, बजरंग कांबळे, कृष्णात पाटील, अनिल चव्हाण, स्नेहप्रिया कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com