

फोटो 50955
पोर्तुगीज चित्रपट महोत्सवास प्रारंभ
कोल्हापूर, ता. १२ ः शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग आणि द कमॉइश इन्स्टिट्यूट या दोन संस्थांमधील सामंजस्य कराराअंतर्गत आजपासून विद्यापीठत पोर्तुगीज चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. गुरुवारी (ता. १३) वनस्पतीशास्त्र विभागाच्या नीलांबरी हॉलमध्ये दुपारी दोन ते चार या वेळेत चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
पोर्तुगालच्या द कमॉइश इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा यांच्या हस्ते महोत्सवाला प्रारंभ झाला. ते म्हणाले, ‘विविध देशांतील, भाषांतील चित्रपट प्रेक्षकांना हे जग समजून घेण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देतात. पोर्तुगीज चित्रपट महोत्सवातील चित्रपटांमधून पोर्तुगाल, भारत आणि ब्राझील या देशांतील वैश्विक बंध बनलेल्या विविध महिलांचे जीवन व्यक्त होते.’
महिला या समाजाच्या मजबूत स्तंभ आहेत. त्यांचे संघर्ष मानवमुक्तीची, अधिक मानवी जगाच्या निर्मितीची प्रेरणा देतात. भारत आणि पोर्तुगाल या देशांत आता अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषा शिकून करिअरच्या विविध संधी घ्याव्यात, असेही ते म्हणाले.
कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नसतात. ते पाहताना एखादे पुस्तक वाचल्याचा अनुभव मिळतो. जागतिक आणि भारतीय भाषांतील चित्रपट पाहण्यातून माणसाचे जग समृद्ध होते. विद्यार्थ्यांनी विदेशी भाषा शिकून जगणे समृद्ध करावे.’
विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका माळकर, ज्योती पाटील, गीतांजली शहा उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.