तंत्रज्ञान अधिविभागास सर्वसाधारण विजेतेपद
51099
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या शिवस्पंदन क्रीडा स्पर्धेतील विजेत्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या खेळाडूंसोबत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू पी. एस. पाटील, डॉ. शरद बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
.............
विद्यापीठाच्या कॅम्पसमधून
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत
कुलगुरू डॉ. शिर्के ः शिवस्पंदन महोत्सवाचे बक्षिस वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः ‘शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावेत,’ अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली. विद्यापीठात झालेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, ‘शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजनच मुळात जास्तीत जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, या उद्देशाने केले आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन कामगिरी उंचावत ठेवावी.’
स्पर्धेतील विजेत्या संघांना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण पाटील यांनी आभार मानले.
.............
चौकट...
‘तंत्रज्ञान’ला विजेतेपद
शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात तंत्रज्ञान अधिविभागाने सर्वसाधारण विजेतेपद, तर क्रीडा अधिविभागाने दुसरा आणि गणित अधिविभागाने तिसरा क्रमांक पटकाविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

