

शिरोळमध्ये भूजलातील ‘नायट्रेट’चे प्रमाण जास्त
जिल्ह्यातील उर्वरित भागात स्थिर ः लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम शक्य
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : पर्यावरण, मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असलेल्या भूजल पातळीतील ‘नायट्रेट’चे प्रमाण सुरक्षा मर्यादेपेक्षा शिरोळ तालुक्यात काहीसे जास्त आहे, तर जिल्ह्यातील उर्वरित भागात स्थिर व अन्य घटकांसाठी जिल्ह्यातील भूजल वापरायोग्य आहे.
शिरोळ तालुक्यात ऊस, भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजनपासून तयार केलेल्या खतांचा वापर सर्वाधिक आहे. जेव्हा अशी खते पिकांसाठी वापरली जातात, तेव्हा या खतातील नायट्रोजनचा अंश पाझरुन पाण्याद्वारे जमिनीत मुरला जातो. नंतर नायट्रोजनचे हे अंश भूजलातील पाण्याच्या साठ्यांमध्ये जाऊन स्थिर होतो. जेव्हा भूजलातील पाणी कुपनलिका, विहिरीच्या माध्यमातून पिण्यासाठी वापरले जाते, तेव्हा पिण्याच्या माध्यमातून अन् ८० टक्के नायट्रेटसचे अंश पालेभाज्यांमधून शरिरात प्रवेश करतात. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जसे की कर्करोग, ब्लू बेबी सिंड्रोम, चक्कर येणे, डोकेदुखी, रोगप्रतिकारक शक्ती आदींवर परिणाम होतो.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहाय्यक भूवैज्ञानिक जयंत मिसाळ म्हणाले, ‘भूजलातील पाण्यातील घटकांचे प्रमाण नेमके किती आहे, याची पाहणी दर महिन्याला केली जाते. यानंतर जिल्हा परिषदेकडे हा अहवाल दिला जातो. यानंतर भूजलातील कोणते घटक जास्त आहेत, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी क्लोरिनेशन आणि अन्य पर्याय ग्रामपंचायत पातळीवर सुचविले जातात. लोकांमध्ये भूजल आणि पिण्याच्या पाण्याविषयीची जागृती केली जाते. भूजलातील घटकांमधील सुरक्षा मर्यादा निश्चित केलेली आहे.’
...
कोट
कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान भरपूर आहे. पाण्याची उपलब्धतता व्यवस्थित असल्याने भूजलातील जैविक, रासायनिक आणि भौतिक घटक विरघळण्याचे प्रमाण चांगले आहे. म्हणजे, भूजलात दरवर्षी पावसामुळे पाणी मिळत असल्याने कोणत्याही एका घटकांचे प्राबल्य राहत नाही. ते विरघळले जाते. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी, शेती, गुरेढोरे, जलचरांसाठी ते एक सुरक्षेचे मानक समजले जाते.
-जयंत मिसाळ, सहाय्यक भूवैज्ञानिक
...
चौकट
इकडे लक्ष द्या
कुपनलिका, विहीर खोदल्यानंतर तिथल्या पाण्यामध्ये रासायनिक, जैविक, भौतिक घटकांचे प्रमाण किती आहे, ते शोधून पाणी पिण्यायोग्य आहे, की नाही याची खात्री करण्यासाठी लोकांनी कसबा बावड्यातील मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेशी संपर्क साधावा. जिल्हास्तरीय आणि उपविभागीय अशा पाच प्रयोगशाळा असून, उपविभागात कोडोली, शिरोळ, सोळांकुर, गडहिंग्लज तर जिल्हास्तरीय प्रयोगशाळा कोल्हापूरात ताराबाई पार्कमध्ये आहे. फक्त ६०० रुपयांमध्ये या घटकांची तपासणी करुन मिळते. खासगी स्तरावरील प्रयोगशाळेमध्ये हेच शुल्क जास्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.