खंडोबा तालीम ‘अ’ ची विजयी सलामी

खंडोबा तालीम ‘अ’ ची विजयी सलामी
Published on

52068, 52034
कोल्हापूर : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ झाला. ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्‍घाटन केले. यावेळी पुष्कराज क्षीरसागर, रामदास काटकर, दीपक काटकर, रणजित खांडेकर, दीपक बराले, महेश नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
.....................
लोगो ः उत्तरेश्‍वर चषक फुटबॉल स्पर्धा

खंडोबा तालीम ‘अ’ ची विजयी सलामी

उत्तरेश्‍वर चषक स्पर्धेला प्रारंभ ः पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’चा दोन-शून्यने पराभव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः उत्तरेश्‍वर चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ ने पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’चा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत विजयी सलामी दिली. छत्रपती शाहू स्टेडियमवर आजपासून स्पर्धेला प्रारंभ झाला.
स्पर्धेत आज खंडोबा तालीम ‘अ’ आणि पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ या दोन संघांत सलामीची लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासून खंडोबा संघाचे वर्चस्व राहिले. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटास नवीन रेघूने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला एक विरुद्ध शून्य गोलची आघाडी मिळाली. या गोलनंतर बरोबरी साधण्यासाठी पाटाकडील ‘ब’कडून ओंकार देवणे, सार्थक राऊत, रोहन कांबळे, साहील भोसले, कुपेंद्र पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना पूर्वार्धात यश आले नाही.
उत्तरार्धात सामन्यात बरोबरी साधण्याच्या उद्देशाने पाटाकडील ‘ब’ संघाने मैदानात प्रवेश केला. पाटाकडीलकडून आघाडीच्या खेळाडूंकडून गोल करून बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मोठ्या गोलक्षेत्रात थेट फटक्याद्वारे गोल करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, खंडोबाचा गोलरक्षक देबजित घोषालने कधी डावीकडे, तर कधी उजवीकेड झेपावत त्यांचे गोल करण्याचे इरादे फोल ठरविले. खंडोबाच्या कुणाल दळवी, प्रथमेश गावडे, रोहन आडनाईक, आदित्य लायकर यांनी खोलवर चढाया करीत पाटाकडील संघावर दबाव निर्माण केला. अखेरच्या काळात दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या. खंडोबाकडून प्रभू पोवारने ८० व्या मिनिटाला मिळालेल्या मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाची आघाडी दोन विरुद्ध शून्य अशी भक्कम केली. या गोलनंतर पाटाकडीलकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न झाले; पण खंडोबाच्या बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अखेरीस खंडोबा संघाने हा सामना दोन विरुद्ध शून्य गोलने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. ‘सामनावीर’ म्हणून खंडोबाच्या प्रभू पोवारला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्‍घाटन ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पुष्कराज क्षीरसागर, उत्तरेश्‍वर प्रासादिक तालमीचे अध्यक्ष रामदास काटकर, दीपक काटकर, दीपक घोडके, रणजित खांडेकर, दीपक बराले, महेश नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
.............
उद्याचा (गुरुवार) सामना
दु. ४ वा. ः शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब
.....
सामनावीर ः प्रभू पोवारल (खंडोबा तालीम मंडळ ‘अ’)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com