पल्लवी यादव हिचे नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशीपमध्ये यश

पल्लवी यादव हिचे नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशीपमध्ये यश
Published on

52064
पल्लवी यादव
............
नॅशनल ऑटोक्रॉसमध्ये
पल्लवी यादव विजेती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः चेन्नई येथील फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस् क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय)तर्फे आयोजित केलेल्या इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी यादव हिने महिलांमध्ये खुल्या गटात विजेतेपद पटकाविले.
मद्रास इंटरनॅशनल सर्किट येथे ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या फोरव्हीलर टाईम ॲटक कार रेसमध्ये महिलांमध्ये पल्लवीने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत देशभरातील स्पर्धक चालक व संघ सहभागी झाले होते. यात मॉडिफाईड व स्टॉक श्रेणींमध्ये विविध वर्गांचा समावेश होता. स्टॉक श्रेणीत पल्लवीने १४०० सीसी, १६५० सीसी मिश्र श्रेणीमध्ये तिसरे स्थान मिळवले. तत्पूर्वी महिला खुल्या श्रेणीतही पहिले, तर नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपही पटकावली. वर्षभरातील या स्पर्धेतील रेटिंगमध्ये अव्वल ठरलेल्या स्पर्धकांना शनिवारी (ता. २२) चेन्नईत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात चॅम्पियनशपि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पल्लवीला व्हीएम स्पोर्टस् फाउंडेशनचे वामसी मेर्ली, ए ॲन्ड ए मोटर स्पोर्टस्, बंगळूर रेसिंगचे रेसर व प्रशिक्षक अनीश नाथ आणि कोईम्बतूर रेस कार ट्यूनर टीम, स्प्रिंट मोटर स्पोर्टस् यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com