

राज्यात एक मे ‘मागणी दिन’ पाळणार
-
महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेचा निर्णय
कोल्हापूर, ता.१८ ः राज्यातील विविध बँकेतील बँक मित्रांच्या अन्यायाबद्दल एक मे 2025 ला महाराष्ट्रात ‘मागणी दिन’ पाळण्यात येणार आहे. राज्यातील विविध बँकांमध्ये 20 हजाराहून अधिक बँक मित्रांवर (बँक एजंट) होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य राज्य बँक मित्र संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेतर्फे पुण्यात झालेल्या राज्यातील बँक मित्रांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना भेटून संघटनेतर्फे बँक मित्रांच्या विविध मागण्याची निवेदन दिले जाणार आहे. बँक मित्रांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती प्रत्यक्ष भेटून दिली जाणार आहे. त्यांच्यावरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशीही विनंती केली जाणार आहे.
सभेस संघटनेचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या सहसचिव ललिता जोशी, शिरीष राणे, शैलेश तळेकर, स्टेट फेडरेशनचे पदाधिकारी समित नंबियार आदीउपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.