यादव गवळी समाज फोरम मार्फत शैक्षणिक व्याख्यान
यादव गवळी
समाज फोरमतर्फे
करियर मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. २५ : उद्योजक नोकरदार संचलित गवळी समाज फोरमतर्फे शैक्षणिक व करियर मार्गदर्शन कार्यक्रम इंजिनियरिंग असोसिएशन सभागृहामध्ये झाला. समाजाचा प्रगत विकास व्हावा यासाठी समाजोपयोगी उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत. ते यशस्वी करण्यासाठी पाठबळ द्यावे असे आवाहन फोरमचे अध्यक्ष अनिल चिले यांनी केले.
वक्ते प्रा. तानाजी चव्हाण यांनी विज्ञान क्षेत्रातील नीट, जेईई, एमएचसीईटी, ए.आय, एमसीए, एनडीए, आर्मी, एअर फोर्स, नेव्ही, अधिक क्षेत्रात करिअर कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. दीपक अतिग्रे यांनी यूपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा, राज्यसेवा परीक्षेचे नियोजन कसे करावे? यावर मार्गदर्शन केले. प्रा अनिल महाजन यांनी सीए, सीएस, सीएनए, एमबीए, बँकिंग परीक्षा आदी क्षेत्राबद्दल मार्गदर्शन केले.
उपाध्यक्ष सतीश पंदारे, अजित दाते, संजय कोटकर, मंगेश डाकवे, प्रसाद काटाळे, सचिन गवळी, किरण चिले, महेश दिवेकर, शैलेश पंदारे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

