सदुसष्ट वर्षीय ‘जलपरी’चे अद्‍भुत साहस

सदुसष्ट वर्षीय ‘जलपरी’चे अद्‍भुत साहस
Published on

54308
नलिनी पाटील
...............
सदुसष्ट वर्षीय ‘जलपरी’चे अद्‍भुत साहस

नलिनी पाटील यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धेत धवल यश

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः लहानपणी वडिलांमुळे लागलेल्या पोहण्याचा छंदामुळे आज वयाच्या ६७ व्‍या वर्षीही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट सुरू आहे. कळंबा येथील नलिनी पाटील यांचा रंकाळ्यात पोहण्यापासूनचा प्रवास महापुरात जीवाचा धोका पत्करण्यापर्यंत पोहोचला आणि वयाच्या पासष्टीनंतर तर तो समुद्रातील पोहण्याच्या स्पर्धेत पदके जिंकण्यापर्यंत पोहोचला.
नलिनी पाटील यांचे माहेर आझाद चौकाजवळ. वडील स्वातंत्र्यसैनिक. ते रोज रंकाळ्यातील संध्यामठवर पोहायला जायचे. त्यांच्याबरोबर नलिनीही जायच्या. भावंडांसोबत पोहण्याची शर्यत रंगायची. वय वाढत जाईल तसा हा छंदही वाढत गेला. लग्नानंतर त्या शिशू विद्या विहार शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तेथे विद्यार्थ्यांनाही त्या पोहण्याचे धडे देऊ लागल्या. २००६ च्या पुरात प्रयाग ते शिवाजी पूल या १० किलोमीटरच्या टप्प्यात त्या पंचगंगा विहार मंडळातील सदस्यांच्या सोबतीने पोहल्या. सुरुवातीला घरातील घाबरतील, या विचाराने त्यांनी घरी कळू दिले नाही. त्याच्याच दुसऱ्या वर्षी म्हणजेच २००७ मध्ये शिवाजी पूल ते शिरोली पंचगंगा असा पोहण्याचा अनुभव घेतला. सध्याही त्या महापुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात.
२००८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पोहण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. लातूर येथे झालेल्या स्पर्धेत ५० मीटर फ्री मध्ये सुवर्ण, ५० मीटर ब्रेस्टमध्ये रौप्य, तर १०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात रौप्य पदकांची कमाई केली. २०१७ पासून विविध स्पर्धांमध्ये त्या सहभागी होऊ लागल्या. आजपर्यंत त्यांनी ९१ पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स ॲक्वॅटिक असोसिएशनच्या मानद उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे आयोजित दोन किलोमीटर सागरी स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले, तर महापुरात २२ मैलांचे अंतर पार करणाऱ्या तसेच कळंबा तलावात पोहणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. नुकतेच त्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे वयाच्या ६७ व्या वर्षी एक किलोमीटरचे अंतर पार करून रौप्यपदक पटकावले.
...........
विशेष मुलांनाही पोहण्याचे धडे
स्वतः पोहण्याचा आनंद घेताना त्यांनी इतरांनाही त्याचे धडे दिले. त्याही पुढे जात त्यांनी योजना नरसिंग यांच्या साथीने विशेष मुलांना पोहण्याचे धडे दिले. आजपर्यंत उन्हाळ्याच्या सुटीत विशेष मुलांना शिकवण्यात खंड पडलेला नाही.
.............
कोट...
लहानपणी फक्त पोहण्याचा छंद होता. तो सध्या करिअरमध्ये बदलला आहे. वयाच्या ६७ व्या वर्षीही मी पोहण्याच्या छंदामुळे स्वस्थ, मस्त तरीही व्यस्त आयुष्य आनंदाने जगते आहे.
- नलिनी पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com