

लोकपरंपरेच्या थाट
अन् सामाजिक संदेशही
कोल्हापूर, ता. ३० ः जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळातर्फे काढलेली गुढीपाडवा शोभायात्रा लक्षवेधी ठरली. स्त्री सन्मान, पर्यावरण, स्वच्छता, पाणी बचतीचा संदेश शोभायात्रेतून दिला. लेझीम व ढोल-ताशांच्या ठेक्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकपरंपरेचा थाटही शोभायात्रेतून दिसला. हिंदू नववर्षारंभ स्वागत्तानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते.
प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरून शोभायात्रेस सुरुवात झाली. सुरुवातीला अमृतकलशासह साधू, संताचा देखावा, पन्हाळगडावरील तोफ व राम लक्ष्मण व सीता यांचा देखावा होता. लेझीम व ढोल-ताशांचा ठेका सुरू होताच शोभायात्रा पुढे पुढे सरकू लागली. कलशधारी व गुढ्या घेतलेल्या महिला, भगवे ध्वज, निशाणधारी पुरुष, दुचाकीस्वार युवक यांनी शोभायात्रेला रंगत आणली. फुलांच्या माळांनी सजविलेल्या पालखीत नरेंद्राचार्य महाराजांची प्रतिमा, बांदीचे दोन रथ, शिवाजी महाराज, संत व मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक होते. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, बिंदू चौक ते प्रायव्हेट हायस्कूल असा शोभायात्रेचा मार्ग होता. कोल्हापूर जिल्हा सेवा अध्यक्ष कृष्णात माळी, एम. आर. पाटील, दिलीप कोळी, मधुकर बाबर, अमोल पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.