

८१ लाखाचा
घरफाळा जमा
कोल्हापूर, ता. ३० ः. रविवार असूनही आज ८१ लाख २६ हजारांचा घरफाळा जमा झाला. आजतागायत ७६ कोटींवर तर पाणीपट्टीचे ५६ कोटी जमा झाले आहेत. सुटीचा दिवस असूनही नागरी सुविधा केंद्रे रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यंदा महापालिकेने ८० टक्के तसेच ५० टक्के सवलत योजना सुरू केली. त्या योजनेतील ५० टक्के सवलतीचा उद्या शेवटचा दिवस आहे. अनेक नागरिक मोबाईलवरून बिल भरतात, पण ज्यांना शक्य होत नाही, त्यांच्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुरू आहेत. या दोन्हीमधून आज घरफाळ्याची ८१ लाखांवर जमा झाली. १एप्रिल २०२४ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत ७६ कोटी ७४ लाख ९६ हजार जमा झाले. एक लाख दहा हजार नागरिकांनी घरफाळा भरला आहे. आज शासकीय तंत्रनिकेतनकडून थकीत घरफाळ्यापोटी ७१ लाख ६९ हजाराचा धनादेश दिला. यंदा १०१ कोटींचे उद्दिष्ट होते.
पाणीपुरवठा विभागाकडे ९१ कोटी उद्दिष्टांपैकी आज अखेर ५६ कोटी जमा झाले आहेत. विलंब आकार सवलत योजने अंतर्गत १३ कोटी ८४ लाख ५९ हजार जमा झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.