

बिंदू चौक परिसरातील हातगाड्या बंद करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. ४ ः बिंदू चौक, गंजी गल्ली, मटण मार्केट परिसरातील रस्त्यावरील बेकायदेशीर चिकन ६५ तसेच इतर मांसाहरी हातगाड्या, हॉटेलवरून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती बंद करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे परिसरातील नागरिकांच्या बिंदू चौक अतिक्रमणविरोधी कृती समितीने केली आहे. त्याबाबतचे निवेदन महापालिकेला दिले आहे.
मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदन पाठवल्याचे नमूद केले आहे. यानिवेदनात म्हटले आहे, काही लोक चिकन ६५ तसेच इतर मांसाहरी पदार्थांची विक्री विनापरवाना हातगाड्यांवर करत आहेत. त्यातून काही धार्मिक स्थळाजवळ वादावादीचे प्रकार होत आहेत. या हातगाड्या व हॉटेलमुळे केवळ काही फुटांचाच रस्ता वहिवाटीस राहतो. त्यातून महिलांना नीट जाताही येत नाही. तसेच आगीसारखी घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहनही येऊ शकत नाही. दारू पिऊन येणाऱ्या लोकांमुळे महिलांच्या छेडछाडीच प्रकार वाढले आहेत. घुशी, उंदिर, कुत्री, मांजरांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारातून समाजकंटक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तातडीने या हातगाड्या व हॉटेल बंद करावीत. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना दिलेल्या निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.