व्हाईट आर्मीचे वैद्यकीय पथक मदतीसाठी थायलंडसह म्यानमारला जाणार

व्हाईट आर्मीचे वैद्यकीय पथक मदतीसाठी थायलंडसह म्यानमारला जाणार
Published on

‘व्हाईट आर्मी’ चे
वैद्यकीय पथक
थायलंडला जाणार

कोल्हापूर ः येथील व्हाईट आर्मीच्यावतीने थायलंड आणि म्यानमारमधील भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि वस्तु पाठविल्या जाणार आहेत.
म्यानमार व थायलंडमध्ये २८ मार्चला विनाशकारी भुकंप झाला. यात जीवित व मालमत्ता हानी मोठ्या प्रमाणात झाली. अजूनही बरेच नागरीक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पूर्वीचा ब्रम्हदेश आजचा म्यानमार हा प्राचीन काळापासून भारताचा भूभाग राहिला आहे. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली आहे. आपत्ती कोणतीही असो त्यात कोल्हापूरची व्हाईट आर्मी ही देश व अन्य बाबींचा विचार न करता मदतीला धावून जाते. भारतीय लष्कराच्या बरोबरीने किंबहूना त्याही अगोदर पोहचून तेथे बाधितांना सुखरुप काढले असून त्यांचे योग्य ते पुनर्वसन होण्यास मदतही केली आहे. म्यानमारच्या वैद्यकीय संसाधनांचा विचार करता आरोग्य सेवा सुविधा पुरवणे तत्काळ गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारच्या ऑपरेशन ‘ब्रम्हा’ पाठोपाठ कोल्हापूरच्या व्हाईट आर्मी तर्फे एक वैद्यकीय पथक लवकरच पाठविले जाणार आहे. इच्छुकांनी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com